Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईबॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटीची जमीन 20 लाखात घेतली फडणवीसांचा बॉम्ब

बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटीची जमीन 20 लाखात घेतली फडणवीसांचा बॉम्ब


मुंबई (रिपोर्टर)-1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबियाने साडेतीन कोटीची जमीन अवघ्या 20 लाखात खरेदी केल्याचा गौप्यस्फोट करत नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगून खळबळ उडवून दिली. त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असा सवाल फडणवीसांनी करत 2005 पासून आजपर्यंत झालेल्या जमीनीच्या चार व्यवहारांचे कागदपत्र आपण तपासी यंत्रणेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना देणार असल्याचे त्यांनी म्हटले.


मी घोषणा केली होती की काही गोष्टी दिवाळीनंतर तुमच्यासमोर आणेन. थोडा उशीर झाला. कारण कागद गोळा करत होतो, काहींचे पत्रकार परिषदेचे दिवस आधीच बुक होते. मी सांगणार आहे ती सलीम जावेदची स्टोरीही नाही आणि इंटरव्हलनंतरचा सिनेमाही नाही. फार गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला हा मुद्दा आहे. सरदार शहावली खान हा 1993 चा गुन्हेगार आहे. याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो तुरुंगात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात तो फायरिंगच्या ट्रेनिंगमध्ये सहभागागी झाला. बीएसई आणि पालिकेमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचे, याची रेकी त्यानी केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बब्लास्टच्या कारस्थान मांडणीवेळी ते उपस्थित होते. टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्यानी आरडीएक्स भरलं. साक्षीदारांनी याविषयी साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. मोहम्मद अली इशाक पटेल उर्फ सलीम पटेल. आर. आर. पाटील इफ्तार पार्टीमध्ये गेले होते तेव्हा त्यांची गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल झाला होता. त्यांचा दोष काही नव्हता. पण ज्या दाऊदच्या माणसासोबत म्हणून त्यांचा फोटो व्हायरल झाला, तो हा सलीम पटेल. तो हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर, फ्रंटमॅनही होता. हसीना पारकरला 2007मध्ये अटक झाली, तेव्हा सलीम पटेललाही अटक झाली. दाऊदनंतर हसीना पारकरच्या नावाने संपत्ती गोळा केली जायची. सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करून पैसा गोळा केला जायचा. हा सलीम पटेल जमीन लाटण्याच्या धंद्यातला सर्वात प्रमुख माणूस होता. कुर्ल्याच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीवेळीच एलबीएस रोडवरची ही जमीन रेडीरेकनर रेट 8500 आणि मार्केट रेट 2053 रुपये प्रती चौरस फूट दराने घेतली गेली. ही जमीन 30 लाखात खरेदी केली गेली. त्यातही 15 लाखांचं पेमेंट हे मालकाला न मिळता त्यांचा पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी होल्डर सलीम पटेलच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर 10 लाख रुपये शहावली खान ज्याला सरदार खान म्हणतात, त्याला मिळाले. त्यातही 5 लाख नंतर मिळतील असं लिहिलं. म्हणजे 20 लाखात एलबीएस रोडवर 3 एकरच्या जमिनीचा व्यवहार झाला. 2003मध्ये हा सौदा झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना पद सोडावं लागलं. पण तुम्हाला माहिती नव्हतं की सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? मुंबईत बॉम्बब्लास्ट करणार्‍यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली 3 एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का?
या सगळ्या व्यवहारात फार गोंधळ आहे. 2003मध्ये याच मालमत्तेमध्ये ते टेनंट देकील झाले, मग ट्रान्सफर केली, मग पुन्हा खरेदी केली. हा थेट अंडरवर्ल्डशी संबंध दिसतोय. मला या गोष्टीचं दु:ख आहे. मुंबई बॉम्बब्लास्टच्या दुर्दैवी घटनेची तुम्ही आठवण काढा. हा कट ज्यांनी रचला, रेकी केली, आरडीएक्स भरलं अशा व्यक्तीसोबत तुम्ही व्यवहार करता? अशा एकूण 5 मालमत्ता आहेत, ज्यापैकी चारमध्ये 100 टक्के अंडरवर्ल्डचा संबंध आहे. 2005पासून 2 वर्षांपूर्वीपर्यंतचे हे व्यवहार आहेत. मुंबईच्या खुन्यांशी तुम्ही व्यवहार का केला? असे एक ना अनेक प्रश्‍न त्यांनी विचारले.

‘मै आ रहा हुँ’
-नवाब मलिक

nawab malik 1
नवाब मलिक


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी व त्यांच्या घरातील सदस्यांनी 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून कमी भावात जमीन खरेदी केली, असा गौप्यस्फोट करत नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे म्हटल्यानंतर काही वेळातच नवाब मलिक यांनी ट्विट करून ‘मै आ रहा हुँ’ म्हणत सस्पेंन्स वाढवून ठेवला. दिवाळीपुर्वी फडणवीसांसह मलिक यांनी दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचे म्हटले होते. फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर आरोप केले. आता दुपारी दोन वाजता नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार आहेत. तत्पुर्वी त्यांनी मै आ रहा हुँ असे ट्विट केल्याने आजच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Most Popular

error: Content is protected !!