Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडअंबाजोगाईअंबासाखर जमीनविक्री प्रकरणात आम्ही शेतकर्‍यांच्या बाजूने -माजी खा. राजू शेट्टी

अंबासाखर जमीनविक्री प्रकरणात आम्ही शेतकर्‍यांच्या बाजूने -माजी खा. राजू शेट्टी


स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी
यांनी विक्री केलेल्या जमिनीची केली पाहणी!!
अंबाजोगाई (रिपोर्टर)- अंबासाखर च्या विद्यमान संचालक मंडळाने बेकायदेशीर केलेल्या 25एकर जमीन विक्री प्रकरणात बीड जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. आज दि.9 नोव्हेंबर सकाळी 8.30 वाजता अंबासाखर (वाघाळा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संवाद- बैठक संपन्न झाली.
यावेळी स्वाभीमानी विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे ,जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांची उपस्थितीती होती. अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या विक्री केलेल्या 25 एकर जमिनीची पाहणी करून माजी खा. राजू शेट्टींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचा सक्षम पद्धतीने गळीत हंगाम तात्काळ चालू करावा , यावर्षी साखरेचे दर तेजीत आहेत त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एकरकमी एफआरपी + 300 रुपये दर जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी दिले पाहिजेत. जे साखर कारखाने एकरकमी एफआरपी देणार नाहीत त्यांना स्वाभीमानी स्टाईल धडा शिकवन्यात येईल. कोरोना संचारबंदीच्या काळात शेतकर्‍यांना अंधारात ठेऊन विद्यमान संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या जमीन विक्री प्रकरणाचे ठराव घेऊन साखर आयुक्त, पुणे यांची कागदोपत्री दिशाभूल करत 25 एकर जमीन बाजारी मूल्यापेक्षा अत्यंत कवडीमोल किंमतीत बिल्डरांच्या घशात घातली आहे शेतकर्‍यांची जमीन विक्री केलेल्या संचालक मंडळाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मा. उच्च न्यायालयात खेचले आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना या प्रकरणात शेतकर्‍यांच्या बाजूने शेवटपर्यंत न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहील असे वचन राजू शेट्टी यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिले.


बिल्डरांना जमिनीचा ताबा घेऊ देऊ नका -कुलदीप करपे
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यावर प्रादेशिक साखर सहसंचालक औरंगाबाद यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 78 आ (1) प्रस्तावित केलेली कारवाई तात्काळ कारवाई करून प्रशासक नेमावा व कारखाना सक्षम एजन्सीला चालवायला द्यावा .जमिन विक्रीतुन व राष्ट्रीय महामार्गात संपादीत जमिनीच्या आलेल्या कोट्यवधी रु.चा हिशोब अगोदर द्यावा. शेतकर्‍यांना एफआरपी देण्याच्या नावाखाली संचालक मंडळ मोठा घपला करत आहे. कुठल्याही परिस्थितीत बिल्डरांना जमिनीवर ताबा घेऊ देऊ नका असे आवाहन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष योगेश शेळके शहराध्यक्ष अभिजित लोमटे, सरपंच संतोष भगत ,प्रमोद पांचाळ ,सुग्रीव करपे, नवनाथ काकडे,फिरोजभाई पठाण, अशोक साखरे ,विकास धावडे ,गोपाळ सोमाशी, बलभीम भगत ,व्यंकटराव भगत ,आदी पदाधिकारी,शेतकर्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!