Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडपरळीच्या तहसीलवर एसटी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी काढला मोर्चा

परळीच्या तहसीलवर एसटी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी काढला मोर्चा


परळी (रिपोर्टर) एसटी कर्मचार्‍यांनी गेल्या काही दिवसांपासून संप सुरू केला आहे. हा संप अद्यापही मिटला नसून आज परळी येथील एसटी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध केला. शासनाने कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी करण्यात आली.

दिवाळीच्या पूर्वीपासून राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. हा संप अधिकच चिघळत असल्याचे दिसून येत आहे. कर्मचार्‍यांनंतर त्यांचे कुटुंबही या आंदोलनामध्ये सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. परळी येथील एसटी कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. राज्य सरकारने कर्मचार्‍यांची मागणी मान्य करून तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी या कुुटुंबांच्या वतीने करण्यात आली आहे.

Most Popular

error: Content is protected !!