Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडबसस्थानकात चोरी करणारा चोरटा पकडला

बसस्थानकात चोरी करणारा चोरटा पकडला


बीड (रिपोर्टर)- एसटीच्या कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी संप केल्याने बीड बसस्थानकात गेल्या काही दिवसांपासून बस उभ्या केलेल्या आहेत. या उभ्या बसमधील अनेक साहित्य लंपास होत आहेत. यातील जॅक आणि व्हिल पाना चोरून नेताना एक चोरटा रंगेहात पकडला असून त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.


आगार व्यवस्थापक निलेश हरीहरदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्रिंबक रामदास बोरवडे (रा. अयोध्यानगर) याने काल बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या बसमधील जॅक आणि व्हिल पाना चोरून घेऊन जात असताना त्याला येथील कर्मचार्‍यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

Most Popular

error: Content is protected !!