Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeराजकारणसातव यांची निवड बिनविरोध होणार, भाजप घेणार माघार

सातव यांची निवड बिनविरोध होणार, भाजप घेणार माघार


कोल्हापूर (रिपोर्टर)- आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी कॉंग्रेसकडून दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील असतानाच भाजपनं आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलयांनी आज ही घोषणा केली आहे.

चंद्रकांत पाटील हे आज कोल्हापुरात आहेत. कोल्हापुरात आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विधान परिषद निवडणुकीसाठी अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी ते बोलत असताना त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या निवडीबाबतही भाष्य केलं आहे. सातव यांच्या घरात उमेदवारी गेली त्यामुळं आम्ही आमचा अर्ज आज मागे घेत आहोत. प्रज्ञा सातव यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह होता. सातव यांच्या पत्नीला उमेदवारी मिळायला हवी ती किमान आता विधान परिषदेला मिळाली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीसाठी कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्रज्ञा सातव विधान परिषेदवर बिनविरोधा जाव्या यासाठी कॉंग्रेसकडून प्रयत्न केले जात होते कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीला यश आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!