• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

कर्तव्य-कर्म हाच धनंजय मुंडेंचा कृषी धर्म; दिवाळीपुर्वी शेतकर्‍यांना अग्रीम देणार, नसता दिवाळी साजरी करणार नाही

by Beed Reporter
October 16, 2023
Reading Time: 1 min read
0
कर्तव्य-कर्म हाच धनंजय मुंडेंचा कृषी धर्म; दिवाळीपुर्वी शेतकर्‍यांना अग्रीम देणार, नसता दिवाळी साजरी करणार नाही
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हे आहे पालकत्वाचं कर्तृत्व, बीड जिल्ह्याचा विकास हाच ध्यास
बीड (रिपोर्टर)-बीड जिल्ह्याच्या बाबतीत नेहमीच ऊसतोड कामगारांचा जिल्हा आणि मागासला जिल्हा अशी चर्चा केली जाते, मात्र मी कृषीमंत्री या नात्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेती करण्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाची जोड देणार आहे. शेतकर्‍यांनीही आपल्या आर्थिक प्रगतीसाठी यांत्रिकीकरण स्वीकारावे आणि आपली प्रगती करून घ्यावी, सोबतच दिवाळीपुर्वी पीक विम्याची अग्रीम 25 टक्के रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा करायला लावणारच, जर ही रक्कम दिवाळीपुर्वी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली नाही तर एक शेतकर्‍याचा मुलगा म्हणून कृषीमंत्री असलो तरी दिवाळी साजरी करणार नाही, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

येथील सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रीय कृषीविकास योजना व राज्य प्रोत्साहन कृषी विकास योजनेतून जिल्ह्यातील 212 शेतकर्‍यांना मोठे आणि छोटे ट्रॅक्टर कृषी मंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. व्यासपीठावर आ. बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी दीपका मुधोळ-मुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अधीक्षक कृषी अधिकारी  

बाबासाहेब जेजुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत नेहमीच हा जिल्हा ऊसतोड कामगारांचा आहे, मागासलेला जिल्हा आहे, अशा चर्चा केल्या जातात मात्र कृषीमंत्री या नात्याने राज्यासह जिल्ह्यात कृषी विभागात अनेक प्रयोग केले जातील, ज्या योजनांचे पैसे मिळत नाहीत, अशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार ज्यांच्याकडून निधी खेचून आणला जाईल. त्यामुळे कोणत्याही योजनेला निधी कमी पडू देणार नाही, शेतकर्‍यांनीही स्वावलंबनाची शेती ही मानसिकता बदलून शेतीला अनेक जोड धंद्यांची साद द्यावी, यांत्रिकीकरण स्वीकारावे, ज्यांना ट्रॅक्टर दिले आहे, ते सर्व शेतकरी सहा एकरच्या आतील शेतकरी आहेत, त्यामुळे सहा एकर शेतीवर ट्रॅक्टर परवडत नाही, त्यांनी इतर शेतकर्‍यांना आपले ट्रॅक्टर किगरायने द्यावे मात्र अवाजवी किराया आकारू नये, ट्रॅक्टरधारक शेतकर्‍यांनी आपले इमान काळ्या मातीशी राखावे, बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळांना सोयाबीनसाठी 25 टक्के अग्रीम पिक विमा मंजूर केलेला आहे. ज्यांना विम्याबाबत काही कळत नाही, असे काही लोक विमा मिळणारच नाही, कंपन्या ऐकत नाहीत, अशा वल्गना करतात, मात्र मी एक शेतकर्‍याचा मुलगा म्हणून सर्व शेतकर्‍यांना दिवाळीच्या अगोदर 25 टक्के अग्रीम विमा रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणार, जर ही रक्कम दिवाळीपुर्वी जमा झाली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही, असेही या वेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

दिवसभरात मुंडेंच्या चार बैठका
बीड जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्याहेतू राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कंबर कसल्याचे दिसून येते. पालकमंत्र्यांची जबाबदारी मुंडेंवर आल्यापासून बीड जिल्ह्यात निधीचा वर्षाव होत असल्याचे याआधीच संभाजीनगरमधील कॅबिनेट बैठकीत दिसून आले आहे. आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडेंच्या एकूण 4 बैठका होत असून जे पोटात तेच ओठात ठेवत मुंडे बीड जिल्ह्यातल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, ऊसतोड मजूर आणि सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. आज दुपारी दोन वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक होत असून या बैठकीत 410 कोटी रुपयांच्या वार्षीक आराखड्याला मंजूरी मिळणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता बीड जिल्हा खनिजन नियामक परिषदेची बैठक मुंडेंच्या उपस्थितीत होत आहे.

Previous Post

कर्तव्यदक्ष गजानन भातलवंडे यांची पोलीस उपअधिक्षकपदी बढती

Next Post

आरोग्य विभागाच्या विरोधात लक्षवेधी आंदोलन

संबंधित बातम्या

बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
बीड

भूसंपादन मावेजा घोटाळा : तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक निलंबित

by गणेश सावंत
May 22, 2026
Next Post
आरोग्य विभागाच्या विरोधात लक्षवेधी आंदोलन

आरोग्य विभागाच्या विरोधात लक्षवेधी आंदोलन

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?