बीड (रिपोर्टर): जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्ग समुदायातील गरीब कुटुंबासह विधवा महिलांसाठी दिवाळीनिमित्त दिपोत्सव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाद्वारे या कुटुंबांना नवीन कपडे, फराळाचे साहित्य देण्यात आले. गत आठ वर्षांपासून सदरचे कार्य करण्यात येत आहेत. या काामचे आयोजन आणि नियोजन पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुळभिले हे करत आहेत.
गेल्या आठ वर्षांपासून गोरगरीब पिडित महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गुळभिले यांच्या नियोजनाने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने घेण्यात येतात. यावर्षीही जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गीत समुहातील गरीब कुटुंबांसह विधवा महिलांसाठी दिपोत्सवाचा कार्यक्रम राबवण्यात आला. हेल्थ केअर कम्युनिटी ऑफ पॉझिटिव्ह पीपल्स अंबाजोगाई, व्यापारी महासंघ, पत्रकार संघ यांच्या सानिध्यातून सदरचा उपक्रम राबवण्यात आला. हा कार्यक्रम बीड भारत स्काऊट आणि गाईड भवनामध्ये झाला. या वेळी उपस्थित गरजुंना कपड्यांसह फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0000