बीड (रिपोर्टर): रस्ता कामाचे उद्घाटन करण्यासाठी आयोजीत कार्यक्रमानिमित्त पिंपळनेर येथे उभारर्यात आलेला मंडप मराठा समाजाच्या नागरीकांकडून विरोध झाल्यानंतर तो उतरवा लागला आणि नियोजीत सभा रद्द करावी लागली. सदरचा प्रकार हा परवा घडला. भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीमध्ये पिंपळनेर येथे कार्यक्रम होणार होता.
रस्ता कामाच्या उद्घाटनासाठी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीमध्ये पिंपळनेरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचा कार्यक्रम हा पाडव्या दिवशी निश्चित करण्यात आलेला होता. त्यासाठी पिंपळनेर येथील बाजार पेठेसमोर मंडपाची उभारणी करण्यात आली होती. मात्र पुढार्यांना गावबंदी असताना पिंपळनेरमध्ये कार्यक्रम होत असल्याने पिंपळनेरसह परिसरातील मराठा समाजाच्या तरुणांनी कार्यक्रमाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया सोशल मिडियावरून देण्यास सुरुवात केली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढार्यांना गावबंदी आहे, हे माहित असतानाही पिंपळनेर येथे कार्यक्रम कसा होतो, असे प्रश्न उपस्थित केले जावू लागले. त्यामुळे आयोजकांनी मराठा समाजातील तरुणांच्या संतप्त भावना पाहता कार्यक्रम रद्द केला आणि मंडप उतरवून घेतला