Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeकोरोनालसीकरणाची दारोदारी मोहीम, नगर पालिका कर्मचार्‍यांचा सक्रीय सहभाग

लसीकरणाची दारोदारी मोहीम, नगर पालिका कर्मचार्‍यांचा सक्रीय सहभाग

बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढवण्याच्या सुचना आरोग्य विभागाने प्रशासनाला दिलेले आहे. शहरात दारोदारी जावून लसीकरण केले जाऊ लागले. याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. न.प. कर्मचार्‍यांचा यात सक्रीय सहभाग आहे.
बीड शहरात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे हे नगर पालिकेचे प्रमुख उदिष्ट आहे. नगर पालिका प्रशासन दारोदारी जावून लसीकरणासाठी लोकांना आवाहन करत आहे. सोबत आरोग्य विभागाची टिम लस दिली जात आहे. यावेळी न.प.चे कदम, भारत चांदणे, भागवत जाधव, उपकांत जोगदंड, महादेव गायकवाड, मुनेश गायकवाड, पवन लाहोट, राजाभाऊ पवार, राम रोकडे, गौतम जोगदंड, सुनील काळकुटे सह आदिंचा सहभाग आहे.

Most Popular

error: Content is protected !!