परळी (रिपोर्टर): खोटा धनादेश दिल्याच्या आरोपावरून परळी येथील सुवर्णकारास परळी न्यायालयाने सहा महिने कारावास व 6 लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा ठोठावली.
थोडक्यात वृत असे की परळी येथील आरोपी सचिन किशनराव दहिवाळ (जिरेवाडीकर) यांनी व्यवसायसाठी हातउसणे परळी येथील फिर्यादी दादाराव संभाजी मुंडे यांच्याकडुन दिनांक 13.01. 2013 रोजी 2 लाख रुपये व पुन्हा दिनांक 22.02.2013 रोजी रुपये 200000 हात उसणे घेतले होते. सदर रक्कमेच्या परतफेडीकरिता दिनांक.15.06.2015 रोजीचा रुपये 400000 चा आय डी बी आय बँक शाखा परळी वैजनाथ या बँकेचा धनादेश दिला .सदर धनादेश न वटल्यामुळे फिर्यादी दादाराव संभाजी मुंडे यांनी परळी न्यायालयात कलम 138 नि.ई.अँक्टखाली फिर्याद दाखल केली.प्रकरणाची सुनावणी परळी न्यायालय झाली. फिर्यादीचा युक्तीवाद मान्य करून आरोपी सचिन किशनराव दहिवाळ यास उपरोक्त 6 महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.तसेच आरोपींने फिर्यादीस 6 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी.नुकसान भरपाई नाही दिल्यास आरोपीला पुन्हा तीन महिना कारावास भोगावा लागणार आहे व सदर रक्कमेवर 9 टक्के दसादसे दराने व्याज द्यावे लागणार आहे दिले.फिर्यादीच्या वतीने अँड वंसतराव फड अँड.प्रविण फड यांनी काम पाहिले.त्यांना अँड आर व्ही गित्ते नंदागौळकर यांनी मार्गदर्शन केले