गेवराई (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील बोरगाव (बू) याठिकाणी आज सकाळी दहाच्या सुमारास महसुली पथकाने छापा मारला असता दोन ट्रॅक्टर सह दोन केनी या कारवाईत जप्त केले असुन अंदाजे दहा लाख रूपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तहसिलदार संदिप खोमणे यांना गुप्त यंत्रणेमार्फत बोरगाव (बू) याठिकाणी केनीच्या साह्याने अनाधिकृत वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली यानंतर त्यांनी सदर ठिकाणी जाऊन गोदापात्रात छापा मारला व दोन केनीसह ट्रॅक्टर या कारवाईत जप्त करण्यात आले असुन दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई तहसिदार संदिप खोमणे, मंडळाधिकारी पखाले, आंधळे, तलाठी किरण दांडगे, कोतवाल शुभम गायकवाड यांनी केली.