बीड (रिपोर्टर): माहेरहून बीडकडे येणार्या एका 24 वर्षीय विवाहित महिलेला आपल्या मोटारसायकलवर बसवून तिला शहरातील आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी पिडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरातील एक महिला दोन दिवसांपूर्वी आपल्या माहेरी गेली होती. माहेरहून ती बीडकडे येण्यासाठी मंझेरी हवेली फाटा या ठिकाणी थांबली होती. त्याठिकाणी गावातीलच हनुमान श्रीराम कैवाडे हा आला. त्याने महिलेस कुठे जायचे? विचारले असता ‘बीडकडे जायचे,’ असे महिलेने सांगितले असता महिलेस आपल्या गाडीवर बसवले. या महिलेस त्याने आपल्या बीड शहरातील राहते घर अंकुशनगर येथे नेले. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. पिडितेने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी हनुमान कैवाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.