Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमकर्जास कंटाळून वडिलांच्या पाठोपाठ मुलाने केली आत्महत्या

कर्जास कंटाळून वडिलांच्या पाठोपाठ मुलाने केली आत्महत्या


माजलगाव (रिपोर्टर) सुमारे एकच वर्षांपूर्वी खाजगी कर्ज कंटाळुन वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर मुलानेही कर्ज परतफेड होत असलेल्या तागद्याच्या त्रासातून ते तीस वर्षे वय असलेल्या शेतकरी युवकाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक १७ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान राजेवाडी येथील सदर शेतकर्‍याच्या राहत्या घरी घडली.

माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील शेतकरी बाबुराव महागोविंद यांनी एक वर्षापूर्वी खाजगी पतसंस्थेच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी या शेतकर्‍याचे वर्ष श्राद्ध होते. वर्षश्राद्ध झाल्यापासून मागील दोन दिवसांपासून मुलगा नामे ज्ञानेश्वर बाबुराव महागोविंद हा अतिशय तणावाखाली होता याच तणावात आणि बँकेकडून होत असलेल्या छळास कंटाळून शुक्रवारी पहाटे सहा वाजण्याच्या दरम्यान ज्ञानेश्वर यांनी राहत्या घरीच विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून वर्षभरातच एका शेतकरी कुटुंबाने घरातील दोन कर्ते पुरुष गमावल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून गावात देखील हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये ज्ञानेश्वर याचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला असून दिंद्रुड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!