सोनीमोहा येथील प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकार्यांची कारवाई
किल्ले धारूर (रिपोर्टर) तालुक्यातील सोनीमोहा येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या एक दिवस अगोदर रात्रीच्या वेळी सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवाने सरपंच पदाच्या उमेदवाराला सोबत घेऊन रेशनचे धान्य व आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता .याप्रकरणी तहसीलदार यांनी चौकशी समिती नेमणूक करण्यात आली असून 17 नोव्हेंबर रोजी ही समिती गावात जाऊन रेशन दुकानाची चौकशी केली होती . चौकशी दरम्यान अनंदाचा शिधा किटचा रेशन दुकानदाराने अपहार केल्याचा गंभिर प्रकार उघड झाला होता . तहसिलदार यांनी दुकानदारावर कारवाई साठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला आहे . या वर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सेवा सहकारी सोसायटी च्या दुकानाचा परवाना निलंबीत करण्याची कारवाई केली आहे .
धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील ग्रामपंचायतची निवडणूक दि 5 नोव्हेंबर रोजी पार पडली .सोनीमोहा येथे सेवा सहकारी सोसायटीकडे रेशन दुकान आहे . ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाच्या अगोदर एक दिवस रात्रीच्या वेळी गावातीलच सेवा सहकारी सोसायटीचे सचिव ,सरपंच पदाच्या उमेदवारांनी एकत्र येत एका टाटा सुमो गाडीमध्ये रेशनचे गहू तांदूळ व आनंदाचा शिधा एका पॉलिथिन पिशवीत भरण्यात आलेला होता . त्याच्या काही किट बनवून त्या मतदारांना भर रस्त्यावर वाटपही करण्यात आल्या होत्या . सदरील दुकानदाराने आनंदाचा शिधा किट कार्डधारकांना न देता निवडणुकीसाठी प्रचारात वाटप करण्यात आल्या होत्या . कार्ड धारकांचे रेशन व उर्वरित किट या धान्य मतदारांना देण्यात आले होते.यामुळे आचारसंहितेच्या भंगाबरोबरच रेशन दुकानदार यांनी धान्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करून मतदारांना अमिष दाखविण्यात आले होते .या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे ग्रामस्थाकडून करण्यात आली होती .या प्रकरणी तहसीलदार यांनी चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदार पुरवठा , अव्वल कारकून पुरवठा, मंडळ अधिकारी व तलाठी या चार जणांची समिती गठीत करण्यात आली होती . सदर समितीने सोनीमोहा येथे जाऊन 17 नोहेंबर रोजी दुपारी चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालात रेशन दुकानदार यांने गौरी लक्ष्मी साठी देण्यात आलेल्या आनंदाच्या शिधा किट मध्ये अपहार झाल्याचे ऑनलाईन रेकॉर्डवरू अपहार झाल्याचे उघड झाले होते. दाखल झालेली तक्रार गंभिर स्वरुपाची असून दुकानदारा विरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे नुकताच कारवाईसाठी अहवाल पाठविला होता .
.या वर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सेवा सहकारी सोसायटीच्या दुकानाचा परवाना निलंबीत करण्याची कारवाई दि. 29 मंगळवारी रोजी केली आहे . तसे आदेशही काढण्यात आले आहेत.