बीड (रिपोर्टर): वाढती महागाई पाहता दुधाला योग्य दर मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. शासनाने दुधाला योग्य तो भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज शेतकर्यांनी जरुड येथे आंदोलन करून शासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर दूध ओतून दिले. यावेळी अनेक शेतकर्यांची उपस्थिती होती. आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये हजारो शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. मात्र सध्याच्या परिस्थितीत दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. दुधाला हमीभाव 50 रुपये देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज जरुड येथे शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन करून शासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर दूध ओतून दिले. या वेळी धनंजय गुंदेकर, सुधीर काकडे, राजेंद्र राऊत, गणेश जगताप, दिनकर शेळके, सोनलकर, बोरगे, ज्ञानेश्वर जोगदंड, मनोज वाघमारे, सुदर्शन कुटे, मोहन तंबरे, शंकर लचके, भागवत वाघमारे, विनायक लाड, अविनाश वाघमारे, अशोक राऊत, गजानन वाघमारे, अतुल पवार, मोहन राऊत, मधुकर तंबरे, गणेश राऊत, श्रीपत काळे, विलास काकडे, रामेश्वर काळे, सतीश बजगुडे, सतीश साळुंके, रमेश शेळके, सुरेश खडके, आोक बजगुडेसह आदींची उपस्थिती होती.











