बीड – प्रेम संबंधातून 27 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील रामनगर येथे घडली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन जालिंदर लोमटे असे या मयत तरुणाचे नाव आहे.
सचिन जालींदर लोमटे वय 27 वर्षे रा. रामनगर ता. जि. बीड याचे आरोपी यांची मुलगी यांचे आपसात प्रेमसंबंध होते त्यांचे प्रेमसंबंधाला आरोपीतांचा प्रखर विरोध असल्याने त्यांनी मयतास आमच्या मुलीचा नाद सोडुन दे तु हिशोबात रहा असे म्हणून त्यास जिवे मारण्याच्या धमक्या देवुन मानसिक त्रास देत होत त्यामुळे त्या दोघांचे त्रासाला कंटाळुन मयत हयाने घरातील लोखंडी अँगला गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.याप्रकारणी मायाताचे वडील जालिंदर ज्ञानोबा लोमटे यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब विठ्ठल कापसे व सविता बाबासाहेब कापसे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.