• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

कटाक्ष-शिवरायांची शपथ;एकनाथ बाकी अनाथ

by गणेश सावंत
January 31, 2024
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र प्रस्थापीत करण्या हेतू आजपर्यंत कधी झाले नाही, अशा उलथापालथी या पाच वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्राच्या ‘वर्षा’पतीसाठी झाल्या. त्यात दोन पक्ष फुटले अन् कडेलोटाच्या काटावरही आले. मात्र फुटीरवादी यात सावरले का? तर त्यांच्यावरही भविष्याच्या अविश्‍वासाची टांगती तलवार दिसते. तेव्हा अशा वेळी विकासाच्या राजकारणापेक्षा जातीय समीकरणाचे राजकारण हेच आमचे ध्येयधोरण असे ब्रिद राज्यकर्त्यांनी स्वीकाले अन् इथे शिवरायाची शपथ घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरस ठरत कोणाचे नाथ ठरले, मात्र भाजपाचे चाणक्य असलेले फडणवीस अन् राष्ट्रवादीचे अजित पवार मात्र या तिन महिन्यांच्या कालखंडात अनाथ दिसले.


   महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र हाती घेण्यासाठी भाजपाने शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे 40-42 आमदार आपल्या काफिल्यात घेत महाराष्ट्रात सत्ता प्रस्थापीत केली. ऐनवेळी फडणविसांना मुख्यमंत्री न करता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून एकप्रकारे भाजपाच्या दिल्लीश्‍वरांनी महाराष्ट्रात एक वेगळी राजकीय खेळी केली. इथे फडणवीस बॅकफुटवर गेले, मात्र अजित पवारांना तात्वीकदृष्ट्या अथवा सात्विकदृष्ट्या भाजपात कधीच घेणार नाही, अशी भीमगर्जना करणार्‍या फडणविसांना काही दिवसानंतर अजित पवारांसह राष्ट्रवादीतल्या काही आमदारांना भाजपाशी संलग्न करून घ्यावे लागले तेव्हा आता शिवसेनेशी गद्दारी कररार्‍या एकनाथ शिंदेेंचे काय होईल, एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना संपली, एकनाथ शिंदेंसह फुटीरवादी आमदारांचं राजकारण संपलं असा काहीसा आभास राज्यभर निर्माण करण्यात आला. परंतु सत्ताकारणासाठी विकासकारण महत्वाचे नाही तर इथे जातीय समिकरण अधिक महत्वाचे आहे हे पुन्हा एकदा सुरू झालं आणि त्या जातीय समिकरणाला निमित्त भेटलं
मराठा आरक्षण
इकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आदोंलन सुरू केलं, आंदोलना दरम्यान सराटी अंतरवलीत पोलिसांचा बेछुट लाठीमार झाला. त्या लाठीमाराचे समर्थन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी केलं आणि तेथून मराठा समाज पेटून उठला, हट्टाला पेटला. मग समाजाचा नेता असो वा अन्य  समाजाचा नेता असो, सिनियर असो वा ज्युनियर असो, मराठ्यांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला न जुमानता जरांगे हेच भाग्यविधाते समजून अक्रमकपणे या आंदोलनात सहभाग नोंदवला. दोन वेळा सरकारकडून हे आंदोलन शमवण्याचा प्रयत्न झाला. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट छत्रपती शिवरायाच्या पायाला हात लावत शपथ घेतली, ‘मराठ्यांना आरक्षण देणारच’ असे म्हटले तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी ओबीसी हे भाजपाचे आहेत, भाजपाचा डीएनए ओबीसी आहे, असे छातीठोकपणे सांगितले. एकीकडे मराठा-ओबीसी हा वाद लागला. या दोन समाजात दुरावा निर्माण झाला. मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या मताचे एकीकरण आणि धु्रवीकरण यावर रणनीती आखण्यात येऊ लागली. अखेर सरसकट ओबीसीतून आरक्षणाबाबत गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिसूचना काढली. इथे कोण हरले? कोण जिंकले? मराठ्यांचा विजय झाला का? यावर भाष्य करर्‍यापेक्षा शिंदे-फडणवीस-पवार या तिघांपैकी महाराष्ट्रात


कोणाचे पारडे जड
झाले, हे महत्वाचे. मराठा आरक्षणाच्या दरम्यान शेवटच्या टप्प्यापर्यंत गप्प असलेले अजित पवार हे मराठा समाजाबाबत काहीतरी ाबेलून गेले आणि तिथेच अजित पवारांबाबत मराठ्यांचे टाळके हलले तर फडणवीस सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाचे विरोधक असल्याचे मराठ्यांनी मानून घेतले. एकतर अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न घेऊन भाजपाशी संलग्न झाल्याचे उघड सत्य महाराष्ट्र नाकारणार नाही. ज्यांच्याकडे चाणक्य म्हणून पाहितलं जातं ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदापासून शिंदे भाजपाच्या सोबत आले की, दूर गेले. त्यात आता मराठा आरक्षणामुळे शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचे पुन्हा दावेदार ठरू पाहू लागले. शिवरायंची शपथ जो घेतो ाणि ती शपथ जो पूर्ण करतो त्याच्या पाठिशी महाराष्ट्र उभा राहतो हा इतिहास आहे. त्यामुळे ज्या एकनाथ शिंदेंना कमजोर समजलं जात होतं ते राजकीयदृष्ट्या जोर मारत आहेत. एकतर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाला महाराष्ट्र अधिक महत्वाचा आहे मात्र फडणवीसांच्या विरोधात गेलेल्या मराठ्यांमुळे भाजपाला लोकसभेत हक्काचा आकडा मिळणं मुश्कील असल्याने तो जुळवण्यासाठी ओबीसीचे एकीकरण आणि मराठ्यांच्या मतांचे धु्रवीकरण हे भाजपाचे धोरण असले तरी मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर ओबीसीही भाजपाच्या हातून जातो का? याची भीती आता भाजपाला वाटतेय. मात्र यात शिवरायांची शपथ घेणारे एकनाथ ठरले आणि फडणवीस-पवार हे अनाथ तर झाले नाहीत ना? 

Previous Post

हिंमत असेल तर मंडल आयोग रद्द करून दाखवा,भुजबळांचे ओपन चॅलेंज

Next Post

बीडचे विभागीय नाट्य संमेलन ऐतिहासिक ठरेल – डॉ.भारतभूषण क्षीरसागर

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
बीडचे विभागीय नाट्य संमेलन ऐतिहासिक ठरेल – डॉ.भारतभूषण क्षीरसागर

बीडचे विभागीय नाट्य संमेलन ऐतिहासिक ठरेल - डॉ.भारतभूषण क्षीरसागर

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?