मोक्कातील दोन आरोपीसह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त; गेवराईच्या डीबी पथकाची कारवाई
गेवराई (रिपोर्टर) नव्या कोर्याकट बुलेट चोरणार्या टोळीचा गेवराईच्या डीबी पथकाने पर्दाफाश केला असून त्यांनी पाच बुलेट, एक पल्सर आणि एक एचएफ डिलक्स अशा सात गाड्यासह दोन मोक्कातील फरार आरोपीच्या मुसक्या बांधण्यात आल्या. ही कारवाई डिबी पथक प्रमुख सपोनि साबळे आणि त्यांच्या पथकाने केली.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरल्या जातात. पोलिस अनेक दुचाकी चोरट्यांना गजाआड करतात तरी देखील दुचाकीचोर्याचे प्रमाण कमी झाले नाही. आता दुचाकी चोरट्याने बुलेट चोरीकडे आपला मोर्चा वळवला आहे. गेवराई पोलिस ठाण्याचे डिबी पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरेपींचा शोध घेत असताना पाच बुलेट आणि इतर दोन दुचाकी मिळून आल्या. यामध्ये एक काळ्या रंगाची विना नंबरची रॉयल इनफिल्ड कंपनीची एक बुलेट, एम.एच.१२ एन.९८८८ नंबरची एक, एक गन मेटल रंगाची एम.एच.१७ सी.के.११९९, एक काळ्या रंगाची एम.एच.१७ बीके ७३८४, राखाडीरंगाची एम.एच.२० ईएम ७९७० आणि एक लाल रंगाची बजाज एम.एच.१८ बी.क्यु ७८८१, व हिरो एचएफ डिलक्स कंपनीची एम.एच.२१ बीएन ६७५१ अशा सात दुचाकी सह आरोपी सोमनाथ रामदास खटाले (वय २८, रा.खटालेवाडी ता.आष्टी जि.बीड) व संदिप दिलीप कदम (वय २७, रा.डोंगरगाव ता.जि.अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपीविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरील कारवाई अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, डिवायएसपी स्वप्नील राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सतिष वाघ, गेवराई पोलिस ठाण्याचे पेलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथक प्रमुख पोलिस निरीक्षक साबळे, पो.ह.देशमुख, पो.ह.नागरे, पो.ह.जायभाये यांनी केली.