ज्वारी, बाजरी, भोईमुग, कापूससह आदी पिकांचा भरता येणार विमा
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात 70 ते 75 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खरपी पिकाचा विमा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यासाठी बजाज अलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनीकडे विमा भरण्यात येणार असून 31 जुलै 2022 पर्यंत विमा भरण्याची शेवटची तारीख आहे.
गेल्या अनेक वर्षापासून खरीपासह रब्बीचा पीकविमा भरण्णयाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अतिवृष्टी, दुष्काळ यासह इतर संकटामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते. पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतो. शेतकर्यांना दिलासा मिळावा या हेतुने शासनाने पीक विमा भरण्याची योजना सुरू केलेली आहे. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात आतापर्यंत 70 ते 75 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. पेरण्या झाल्यानंतर विमा भरला जातो. सध्या विमा भरण्याची प्रक्रिया सुरू असून बाजरी, ज्वारी, भोईमुग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा इत्यादी खरीप पिकांचा विमा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.








