गेवराई (रिपोर्टर): वीज वितरण कंपनीकडून वेळेवर ट्रान्सफार्मर दिले जात नसल्याने गावकर्यांना अनेक दिवस अंधारात राहावे लागते. धोंडराईमध्ये आठ दिवस झाले लाईट नाही. विजेअभावी समस्या निर्माण होत असून ट्रान्सफार्मर तात्काळ द्यावे या मागणीसाठी सरपंचासह महिलांचे गेवराई विज वितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू आहे.
आठ दिवसांपूर्वी धोंडराई येथील ट्रान्सफार्मर खराब झालेले आहे. त्यामुळे वीज नसल्यावर पाणी आणायचे कुठून? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दुष्काळी स्थिती, प्रचंड उकाडा अशा स्थितीत लाईट नसल्याने गावकर्यांना जाणीवपुर्वक वीज वितरण कार्यालयाकडून त्रास देणे असाच होत आहे. ट्रान्सफार्मरसाठी आज सरपंच शीतल साखरेसह गावातील महिलांनी गेवराईच्या विज वितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.