शिरूर (रिपोर्टर): क्लासला गेलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थीनीला रस्त्यामध्ये अडवून तिचा वाईट हेतुने हात धरत विनयभंग करण्यात आला. ही घटना जय भगवान दूध संघाच्या परिसरात घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानूर येथील सतरा वर्षीय विद्यार्थिनी रेणुका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. सदरील ही विद्यार्थीनी क्लासला गेली असता बीड-पाथर्डी रोडवर जय भगवान दूध संघाच्या परिसरात या विद्यार्थीनीला सुयोग एकनाथ सुरसे या तरुणाने विद्यार्थीनीला अडवून तिचा वाईट हेतुने विनयभंग केला. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.