बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात यंदा उसाचा प्रश्न गंभीर निर्मार झाला असून आतापर्यंत साठ ते पासष्ट टक्के ऊस गाळप झाला, बाकीचा ऊस तसाच फडात उभा आहे. गाळपाअभावी उसाचे चिपाडं होऊ लागले आहे. वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील शेतकरी ऊस जात नसल्याने त्रस्त झाले आहेत. उसाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी एका शेतकर्याने केली आहे.
माजलगाव तालुक्यात तीन सहकारी साखर कारखाने असताना तालुक्यातील बहुतांश शेतकर्यांचा ऊस उभाच आहे. वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील शेतकरी ऊस जात नसल्यामुळे त्रस्त झाले आहेत. ऊस घेऊन जा, अशी विनवणी कारखानदारांकडे केली जात असली तरी कारखानदार मात्र आपल्या मर्जीतील शेतकर्यांचा आधी ऊस गाळप करत असल्याचे दिसून येत आहे. उसाचा प्रश्न गंभीर बनला असून याबाबत प्रशासनाने ऊस गाळपाचं नियोजन करावं, अशी मागणी होऊ लागली आहे.