1 कि.मी.सिमेंट रस्ता तयार करुन भुयारी नाली तयार करण्याचे अधिकार्यांनी दिले आश्वासन
गेवराई (रिपोर्टर)ः- गढी ते माजलगांव या महामार्गावरील सिरसदेवी जवळ रस्त्यावर पाणी जमा होवू लागले. या ठिकाणी तलावाचे स्वरुप निर्माण झाल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होवू लागला. याची दखल आ.लक्ष्मण पवार यांनी घेवून याबाबत महामार्ग अधिकार्यांना निर्देश देत घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठवले. अधिकार्यांनी ज्याठिकाणी पाणी जमा होते त्याठिकाणी 1 कि.मी.सिमेंट रस्ता व भूयारी नाली करण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वी विशाखापटनम महामार्गाचे काम झाले. हा महामार्ग गढी ते माजलगांव या दरम्यान जात आहे. महामार्गावरील सिरसदेवी फाट्याजवळ पाणी जमा होवू लागले. दोन दिवसापासून पाऊस पडत असल्यामुळे सदरील ठिकाणी तलावाचे स्वरुप आले. रस्त्यावर पाणी जमा होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होवू लागला. याची दखल घेवून आ.लक्ष्मण पवार यांनी महामार्ग अधिकार्यांना निर्देश दिले. त्यानूसार आज अभियंता कादरी, खंदारे यांनी घटनास्थळी जावून रस्त्याची पाहणी केली. ज्याठिकाणी पाणी जमा होते. तेथे एक कि.मी. सिमेंट रस्ता व भुयारी नाली करण्याचे आश्वासन देण्यात आले.














