आष्टी (रिपोर्टर):- ओबीसी आरक्षण बचावासाठी वडगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा 10 दिवस आहे.दिवसेंदिवस तब्येत खालावत चाललेली आहे.सरकारकडून दखल घेतली जात नाही.या सरकारला जागे करण्यासाठी व प्रा.लक्ष्मण हाके यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आष्टी तालुक्यातील खिळद ग्रामस्थांचे 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.पहिल्याच दिवसी अख्खा गाव एकवटला होता.महिला तरुण,नागरीक अख्खा आंदोलनात सहभागी झाला होता.तर काल महिलांसह पुरुष तरुण नागरीकांनी खिळद येथील रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तर आज दि.22 रोजी सकाळी ओबीसी बांधवांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला यावेळी आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापच एकच पर्व ओबीसी सर्व अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अंतरवली सराटी मधून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण आंदोलन उभे केले त्याच अंतरवली सराटी च्या वेशावर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे यासाठी प्रा.लक्ष्मण हाके यांचे ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे.त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून अंकुश महाजन,शहादेव गर्जे यांच्या नेतृत्वाखाली खिळद मध्ये आमरण उपोषण सुरू आहे.मागिल 3 दिवसांपासून आंदोलन सुरू असून आज दि.22 जून रोजी उपोषण करणा-या कार्यकर्त्यांनी अनेकांनी मुंडण करत सरकारचा निषेध नोंदवला आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी एकजुटीचा विजय असो, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापच, भुजबळ साहेबांचा विजय असो,प्रा.हाके सरांचा विजय असो,अमर रहे अमर रहे मुंडे साहेब अमर रहे, पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, धनंजय मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,अशा जोरदार घोषणाबाजी करत मुंडण करून घेतले.संपूर्ण ओबीसी समाज प्रा.हाके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याच यावेळी जाहिर केले.