बीड (रिपोर्टर): ज्ञानराधा मल्टिस्टेट, जिजाऊ मल्टिस्टेट यासह इतर मल्टिस्टेट बँकांमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. ठेवीदारांना आश्वासनावर आश्वासनेच दिली जात आहेत. ठेवीदारांनी आपल्या पैशासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केले. हे उपोषण उबाळे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्ञानराधा मल्टिस्टेट दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे या बँकेत ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले. ठेवीदारांना वेळोवेळी आश्वासने दिली गेली मात्र त्यांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत. ज्ञानराधासह जिजाऊ , राजस्थानी, साईराम या मल्टिस्टेटमध्ये देखील ठेवीदारांचे मोठ्या प्रमाणात पैसे अडकलेले आहेत. ठेवीदारांचे पैसे तात्काळ द्यावे यासाठी ठेवीदारांनी आजपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केले. हे उपोषण सचीन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.









