• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

खताचा तुटवडा दाखवून गेवराईच्या व्यापार्‍यांकडून गोरगरीब शेतकर्‍यांची लुट ; कृषी विभाग गप्प

by गणेश सावंत
July 6, 2024
Reading Time: 1 min read
0
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गेवराईचा कृषी विभाग शेतकर्‍यांच्या मुळावर

गेवराई (रिपोर्टर) : यंदा वेळेवर पाऊस पडल्याने, शेतकर्‍यांनी पेरणीसाठी लगबग केली. जवळपास खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात. मात्र, शेतकर्‍यांना खते मिळत नाहीत. शासनाकडून मुबलक प्रमाणात खत उपलब्ध करून दिलेले असताना, येथील ठोक व्यापार्‍यांनी खताचा तुटवडा दाखवून शेतकर्‍यांची लुट केली असून,तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी उंटावरून शेळ्याराखत असल्याने,शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, कृषी आयुक्त आर. बिनवडे यांचा शनिवार ता. 6 रोजी गेवराई तालुक्यात शासकीय दौरा आयोजित करण्यात आलेला असून, त्यांच्याकडे तक्रारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गेवराई तालुक्यात यंदा वेळेवर पाऊस पडला.  शेतकर्‍यांनी पेरणीसाठी लगबग केली. वेळेवर आलेल्या पावसाचा गैर फायदा घेऊन, गेवराई च्या कृषी व्यापार्‍यांनी विशेषत: ठोक  इफको चे 10.26.26 आणि आरसीएफ चा युरिया आदि खतांचा तुटवटा निर्माण करून, गोरगरीब शेतकर्‍यांचा मानसिक छळ केला. मागणी केलेले खत उपलब्ध नाही. शासन स्तरावरून सदरील खते आलेले नाहीत. त्यामुळे, मागणी नसलेली व कंपनीकडून जास्तीचा नफा दिलेल्या खताचा आग्रह व्यापार्‍यांकडून केला जात आहे. परंतू  , शेतकर्‍यांनी मागणी केलेली खते उपलब्ध आहेत. ऑनलाईन आकडेवारी दिसत आहे. गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी 400 टन 10.26.26 , 6290 टन आरसीएफचा युरिया आलेला आहे. एवढा टनाने खताचा साठा उपलब्ध असताना, ठोक व्यापारी खत उपलब्ध नसल्याचे सांगून, विशिष्ट एजंटकडून आलेल्यांना जादा भावाने खत उपलब्ध करून देत आहेत.  गुरूवार रोजी एका एजन्सीकडून माहिती घेतली असता, 10.26.26 खत आलेच नाही. शासनाकडून अद्याप आलेले नाही. त्यामुळे, खत उपलब्ध नाही. असे सांगण्यात आले. पेरणीच्या वेळी बि-बियाणे खरेदी करतेवेळी ही त्रास झाला. आता पेरलेले उगवले आहे. उगवलेले जगवायची धडपड सुरू आहे. याचा गैरफायदा घेऊन, कृषी दुकानदार  एजन्सी  गोरगरीब शेतकर्‍यांची लुट करीत आहेत. धनदांडग्यांना मात्र, खत उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान, गेवराई तालुका कृषी कार्यालयाचे तालुका कृषी अधिकारी उंटावरून शेळ्या राखत आहेत. बि-बियाणे खताच्या बाजारपेठेत खत उपलब्ध असूनदेखील, खताचा तुटवडा निर्माण करणार्‍यांना अभय दिले जात आहे. खताच्या दुकानात जाऊन चौकशी केली जात नाही. एजन्सी धारकांचे गोडाऊन नियमित तपासले जात नाहीत. त्यामुळे, व्यापारी हे शेतकर्‍यांशी मुजोरी करतात. जिल्हा कृषी अधीक्षकांचे लक्ष नाही. सगळा आलबेल कारभार असून, साठेबाजांची तालुका, जिल्हा कृषी कार्यालयाचे अधिकारी पाठराखण करीत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे. दरम्यान,  शनिवार दि.6 रोजी कृषी आयुक्त आर. बिनवडे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर यात आहेत. बिनवडे यांच्याकडे साठेबाज व्यापार्‍यांच्या तक्रारी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गोरगरीब मायबाप शेतकर्‍यांची लुट करणार्‍या  गिधाड गँगला कोणी आवर घालणार आहे की नाही ? असा खडा सवाल उपस्थित केला जात आहे.

गेवराई कृषी कार्यालयाकडून अनेक मंडळाच्या निविष्ठा
गायब, वरिष्ठांची मिलीभगत ; ना.धनुभाऊ तुम्हीच लक्ष घाला

पेरणीच्या मोसमात शासनाकडून कृषी विभागामार्फत येणारे बी- बियाने निविष्ठा कृषी कार्यालयाला प्राप्त झाल्या परंतु गेवराई तालुक्यातील अनेक मंडळाच्या निविष्ठा संबधित कृषी मंडळ अधिकार्‍यांनी खाली दिल्याच नसल्याने पेरणीचा मोसम संपून गेला तरी अद्याप अनेक मंडळातील शेतकर्‍यांना बी-बियाणे मिळाले नसून गेवराई कृषी विभाग हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून येथील संबधित अधिकारी ही मुजोरपणाने वागत असुन शेतकर्‍यांची लूट करत आहेत. याबाबत अनेकवेळा विविध वर्तमानपत्रातुन बातम्या प्रसिद्ध होत असताना वरिष्ठांकडून यांची पाठराखण होत असून या लुटीत वरिष्ठांची मिलीभगत आसल्याचे दिसून येत आहे. मात्र हा सर्व दुर्दैवी प्रकार कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घडत असून ना. धनंजय मुंडे यांनी लक्ष घालून गेवराई कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना धडा शिकवावा अशी मागणी शेतकर्‍यांतुन होत आहे.

Previous Post

दानवेंची उपस्थिती, विरोधकांची पायर्‍यांवर घोषणाबाजी ;अजित पवार, धनंजय मुंडेंचं विरोधकांना चोख उत्तर

Next Post

कालचा सुदामा आजचा खलनायक कसा?रोहीत पवारांचे दळभद्री विचार

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
कालचा सुदामा आजचा खलनायक कसा?रोहीत पवारांचे दळभद्री विचार

कालचा सुदामा आजचा खलनायक कसा?रोहीत पवारांचे दळभद्री विचार

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?