शिरूर (रिपोर्टर): महसूल कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी आज काळ्या फिती लावून आंदोलन केले आहे. शासनाने कर्मचार्यांच्या मागण्या मान्य न केल्यास 15 जुलै 2024 पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. महसूल कर्मचार्यांच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहेत. या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. आज शिरूर येथील कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला. मागण्या मान्य न केल्यास 15 तारखेपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.