आष्टी ( रिपोर्टर):- आष्टी (रिपोर्टर): पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासियांना काल सुखद धक्का देत आष्टी तालुक्यातील काही भागात काल पावसाने धो धो केले. रात्री तीन ते चार तास जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्या तुडूंब भरून वाहू लागल्या. कड्याच्या मुख्य नदीला पूर आला. या नदीवर कडा-नगर जोडणार्या पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी पर्यायी पुल उभा करण्यात आलेला होता. तो पुल या पुरामध्ये पुर्णत: वाहून गेल्यामुळे या मुख्य रस्त्यावरची वाहतूक रात्रीपासून बंद आहे. आष्टी तालुक्यातील धानोरा, कडा, आष्टी या तीन महसूल मंडळात अतिवृष्टी पहावयास मिळाली. पुराच्या पाण्यामध्ये काही ठिकाणी कोंबड्या, शेळ्या वाहून गेल्याचे सांगण्यात येते तर एक-दोन ठिकाणी दोन म्हैस वाहून गेल्याचे सांगितले जाते. कड्याहून नगरकडे जाणार्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

तालुक्यात शेतकर्यांच्या पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पावसाअभावी खरीप हंगाम वाया जातोय की काय, असे चित्र निर्माण झाले होते. तर शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहात होते.परंतु काल सोमवारी दि.8 जुलै रोजी दुपारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली सायंकाळी 7 च्या दरम्यान धो-धो पावसाला सुरूवात झाली मुसळधार पावसाने तालुका झोडपून काढला 7 ला सुरू झालेला पाऊस 10 वाजेपर्यंत जोरदार बरसल्याने नदी नाल्यांना पुर आला होता.तर धानोरा,कडा,आष्टी या 3 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याचे कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कड्याच्या कडी नदीवरील पर्यायी केलेला पुल वाहुन गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे 25 गावांचा संपर्क तुटला आहे.तर पुराच्या पाण्यात वाहून 1 म्हैस ,रेडकू,करडे,कोबड्या वाहून मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत.अनेक गावांचा रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता.अहमदनगर ला ये – जा करणा-या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब वापरावा असे आवाहन तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.दमदार झालेल्या पावसाने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आष्टी तालुक्यात काल दि.8 जुलै रोजी सर्वत्र जोरदार पाऊस बरसला रात्री 7 वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली होती. जवळपास 3 तास सुरू असलेल्या दमदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. तर शेतांना सुद्धा तळ्याचे स्वरूप आले होते.तालुक्यातील कडा,धानोरा,धामणगांव,आष्टी,खुंटेफळ,डोंगरगण,वाळुंज, जामगाव,देविगव्हाण,सोलेवाडी,टाकळी अमिया,शिरापूर, पोखरी,क-हेवडगांव , मातकुळी तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसला तर धानोरा,कडा,आष्टी महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याचे कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले.तालुक्यात जोरदार पावसाने अनेक गावचा विद्युत पुरवठा रात्रभर गायब होता.कडी नदीवरील पर्यायी केलेला पूल वाहून गेला वाहतूक ठप्प झाली असून अहमदनगर ला ये जा करणा-या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आह.जोरदार पावसाने नागरीकांची चांगलीच दाणादाण उडाली होती.3 तास व्यवसायिक दुकानात तर बाहेर गेलेले नागरिक देखील अडकून पडले होते. दमदार पावसाने खरीप पिकांना चांगलेच जीवदान मिळाले आहे. दरम्यान, पावसामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तरी तालुक्यात अद्यापही काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहवयास मिळत आहे.
आज उद्या जोरदार पाऊस
आज आणि उद्या राज्यात आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 8 जुलै ते 10 जुलै या कालावधीत महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
घाटापिंपरीत 1 म्हैस व रेडकु पुरात वाहून मयत
काल रात्री झालेल्या पावसात रात्री 8 च्या दरम्यान अचानक ओढ्याला आलेल्या पुरात झाडाला बांधलेली म्हैस व 6 महिन्याचे रेडकू चा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे तर कोकरेवाडीत ओढ्याच्या प्रवाहात पाणी न बसल्याने 3 करडे 6 कोबड्या मयत झाल्या आहेत.या दुर्दैवी घटनेची स्थळ पाहणी मंडळ अधिकारी एन.डी.औंदकर, तलाठी केंदरणे,यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.











