बीड (रिपोर्टर)ः- नविन मिटर बसवण्यासाठी लाईनमनने 20 हजार रुपयाची लाच मागीतली होती. तडजोडी अंती 15 हजार रुपयात ठरले होते. हे 15 पंधरा हजार रुपये आज सकाळी एका हॉटेल चालकाकडे देण्यात आले होते. लाईनमनच्या सांगण्यावरुन हॉटेल चालकाकडे पैसे दिले होते. या प्रकरणी लाईनमन सह हॉटेल चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंजेरी फाट्यावर घडली.
ीड तालुक्यातील मंझेरी फाटा पाली या परिसरात लाईनमन म्हणून जिवन मुंडे कार्यरत आहे. त्यांनी एका व्यक्तीकडे नविन मिटर बसवून देण्यासाठी 20 हजार रुपये मागितले होते. यामध्ये तडजोड होवून 15 हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र सबंधीतांनी या बाबत लाचलूचपत विभागाकडे तक्रार दिली होती. आज सकाळी पैसे देण्याचे ठरले होते. मंझेरी फाट्यावर असलेले सय्यद अय्यु महोम्मद याच्याकडे 15 हजार रुपये देण्यात आले. हे पैसे स्विकारत असतांना हॉटेल चालकाला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी लाईनमन मुंडे व हॉटेल चालक सय्यद अय्युब या दोघा जणा विरोधात ीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधिक्षक मुकूंद आघाव, शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.गुला बाचेवड, सुरेश सांगळे, अमोल खरसाडे, श्रीराम गिराम, गणेश म्हेत्रे, गणेश निकाळजे यांनी केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात लाच खोरीच्या घटनेत वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक लाच खोरांना लाच लूचपत विभागाने पकडले आहे. लाईनमनला लाच घेतांना पकडल्याने विज वितरण कंपनीत एकच खळबळ उडाली.