बीड (रिपोर्टर): खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये शेतकर्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत पीककर्ज वाटप करण्यात येत असते. यंदा आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख शेतकर्यांना 823 कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये बर्या प्रमाणात पाऊस पडला. मृगनक्षत्रात खरीपाची पेरणी झाल्यानंतर शेतकर्यांनी राष्ट्रीयकृत बँकेकडून पीककर्ज उचलण्यास सुरुवात केली. याची प्रक्रिया मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होत असते. नवीन पीक कर्जधारकांना ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पीक कर्जाचे वाटप होत असते. जुन्या कर्जधारकांना आठ दिवसात पीककर्ज उपलब्ध होत असते. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया अजूनही सुरुच आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील 1.04 लाख शेतकर्यांना 823 कोयींचे पीककर्ज वाटप करण्यात आलेले आहे. सदरील हे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेसह इतर बँकांच्या मार्फत वाटप होत आहे.