जिल्हाप्रशासनाने लक्ष्य देण्याची मागणी; अनाधिकृत खुलेआम दारू विक्रीमुळे घडतात असे प्रकार
मस्साजोग (रिपोर्टर): केज तालुक्यातील मस्साजोग येथील जिल्हा परीषद माध्यमिक शाळेच्या नुतून इमारतीच्या मुख्याध्यापक कार्यलयाच्या खिडक्याची,प्रसाधन गृहांची दरवाजा,सोलारची गावातील काही अज्ञात व्याक्तीकडून तोडफोड केल्यामुळे नवीन इमातीचे मोठे नुकसान झाल्याची घटना दिनाांक 16 मंगळवार रोजी मध्यरात्री घडली आहे
.
मस्साजोग मध्ये खुलेआम दारूविक्री होत असल्याने गावामधील तरूण वर्ग हा व्यासनाधिन होत असल्याने असे प्रकार घडत आहे. अशा प्रकारामुळे गावातील सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहकत्रास सहन करावा लागत आहे. तरी याप्रकरांची जिल्हाप्रशासने सखोल चौकशी करून तोडफोड करणार्या अज्ञात व्याक्ती विरोधात कारवाई करण्याची मागणी मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांच्या पालकाकडून होत आहे.