————————-
गुटखा प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल ; 61 लाखांचा मुद्देमाल जप्त
————————
गेवराई (रिपोर्टर) गेल्या दोन दिवसांपुर्वी एक गुटख्याचा ट्रक बीड जालना रोडवरुन जात असतांना एका राजकीय पुढार्याने तो ट्रक अडविला व त्यांच्या मालकाला खंडणी मागितली तसेच या प्रकरणात तोडपाणी न झाल्याने हा ट्रक पोलिसांच्या स्वाधीन केला. मात्र पोलीसांच्या ताब्यात घेण्याच्या आगोदर एका पोलीस कर्मचार्याने व नेत्याने संगणमत करून या ट्रक मधून 15 ते 20 पोते काढून घेतले असल्याची माहिती असून दोन दिवसानंतर या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनच्या अधिकारी व पोलिस यांनी संयुक्त पंचनामा करत या प्रकरणी गून्हा दाखल करण्यात केला असून या कारवाईत ट्रकसह 61 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या एका गुटखा व्यापाऱ्याचा ट्रक बीड जालना रोडवरून जात असताना तो अडवून संबधित व्यापार्यांकडून मोठ्या रकमेची मागणी झाल्याची चर्चा असून काहीच तडजोड न झाल्याने हा ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर पोलिसांनीही बर्याच हालचाली करत तोडपाणी करण्याचे प्रयत्न केला परंतु काही हिट नाही हे लक्षात आल्यानंतर त्यातील 20 पोते गूटखा काढून घेतला असल्याची माहिती असून यामध्ये एक पोलिस कर्मचारी देखील सहभागी आहे. गेवराई शहारातून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात गूटख्याची ट्रक जाते ही माहिती पोलिसांना माहिती नसावी का? तसेच पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करायच्या आगोदर गुन्हा दाखल करून हात वर केले आहेत. शेवटी दोन दिवसानंतर पोलिसांनी पाढंरवाडी शिवारात ब्रिजच्या खाली हा ट्रक बेवारस सापडला असल्याचे दाखवून गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात गेवराई पोलिसांची भूमिका ही संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवस लोटूनही गेवराई पोलिसांना यांचा वारस सापडलेला नाही ही शोकांतिका आहे. तसेच या ट्रक मधून काढून घेतलेला गूटखा माजलगावच्या व्यापाऱ्याला कुणी? विकला याचा शोध देखील पोलिसांनी लावला नाही. तर सदरील ट्रक हा बीडच्या एका प्रसिद्ध गुटखा व्यापार्याचा असल्याचे बोलले जात आसून पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यामार्फत या घटनेचा तपास करावा व हे रॅकेट उघड करावे अशी मागणी होत आहे.