जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बीड (रिपोर्टर): मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन निघत आहे. गेल्या काही वर्षांपासून कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. कापसाला यावर्षी 15 हजार रुपये हमी भाव द्यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे तर मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी महिलांचे धरणे आंदोलन सुरू आहे.
राज्य सरकारने शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भात कापसाचे मोठे उत्पादन निघते. कापसाला वर्षी पंधरा हजार रुपयांचा हमीभाव द्यावा, अशी मागणी किरण परमार, अमित मिरजे यांनी केली आहे. या दोघांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे तर मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी महिलांच्या वतीने लाक्षणिक उपोषण सुरू आहे. या वेळी राणीताई शेख सह आदींची उपस्थिती होती.