गेवराई (रिपोर्टर): बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आज गेवराई बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या बदंमध्ये सर्व व्यापार्यांनी सहभाग घेतला होता. हा बंद सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता.
बांगलादेश येथील परिस्थिती चिघळल्यानंतर तेथील अल्पसंख्यांकांवर अन्याय करण्यात येत आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ आज गेवराई बंद ठेवण्यात आली होती. तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी केशव पंडीत, सखाराम कानगुडे, सुरेश कारगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.