– आरोपीस 4 दिवसांची पोलीस कोठडी
माजलगाव, (रिपोर्टर)ः- येथील एका शाळेत अल्पवयीन साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच शाळेतील नराधम शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे.राहुल अंबादास वायखिंडे मूळ रा. ब्रह्मगाव ता.कोपरगाव जि.अहील्यानगर असे आरोपीचे नाव असून त्यास 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान शहरवासीयांच्या वतीने उद्या सोमवारी माजलगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
– राज्यात शाळेत शिक्षण घेणार्या शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरूच असून बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका शाळेतील बालवाडीत साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान घडली.या घटनेप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुरूवारी अज्ञात व्यक्ती विरोधात लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला.तर शहरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
माजलगाव शहरात एका शाळेत बालवाडी आहे. त्यामध्ये परिसरातील लहान मुले मुली दररोज येतात या परिसरातीलच एक साडेपाच वर्षाची चिमुरडी नियमित शाळेत येते तिला शाळेतील एका अज्ञात इसमाने दि .25 ते 28 सप्टेंबर रोजी डबा खाल्यानंतर अत्याचार केला. घटनेनंतर चिमुरडी ताप येऊन आजारी पडली त्यामुळे तिला दवाखान्यात उपचार करण्यात आले.घरी आल्यावर तिने शाळेत झालेली ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली.पांढरे कपडे घातलेला माणसाला मी ओळखते असेही सांगितले. या घटनेनंतर चिमूरडीच्या पालकांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार दिली त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध लैंगिक अत्याचार पोस्को गून्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सदरील अल्पवयीन मुलीची अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली तर या घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू व पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांचे सह पोलीस उपनिरीक्षक सुनील दिंडे यांनी सदरील शाळेची चौकशी करून तेथील सीसीटीव्ही ची तपासणी केली तसेच या शाळेतील सर्व शिक्षकांची ओळख परेड घेतली तसेच शिक्षकांच्या फोटो मधून सदरील चिमुरडीने आरोपी शिक्षकाचा फोटो पाहून त्याची ओळख पटवली त्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकराहुल अंबादास वायखिंडे सध्या रां.माजलगाव मूळ रा. ब्रह्मगाव ता.कोपरगाव जि.(अहमदनगर)अहील्यानगर यास अटक केली आहे. दरम्यान या आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायदंडाधिकारी धर्माधिकारी यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चौकट*
सोमवारी माजलगाव बंदचे आव्हान
चिमुरडीवर अत्याचार प्रकरणाचे आता तीव्र प्रतिसाद उमटत असून या घटनेप्रकरणी शहरवासी यांच्या वतीने संबंधित घटनेतील संपूर्ण आरोपींना व संस्था चालकांना कडक शासन करण्यात यावे यासाठी माजलगाव शहरवासीयांतर्फे उद्या दि.7 सोमवारी माजलगाव शहर बंद व मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून हनुमान चौक भागातून हा मोर्चा शहर पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालयावर नेण्यात येणार असल्याचे निवेदन पोलीस ठाण्यात देण्यात आले. या निवेदनावर सुरेंद्र रेदासनी,रामराव दहिवाळ, गजानन बोकन, राजेंद्र टाक, वैजनाथ दहिवाळ, शशिकांत डहाळे, गणेश शहाणे, अजय दहिवाळ, अक्षय आंबिलवादे, लक्ष्मीकांत राम करण कुलथे, अनिकेत आंबीलवादे, मोहित दळवी, रामेश्वर कुलथे, विजयप्रकाश कुलथे, विकास उदावंत, राजू उदावंत, नारायण सातपुते आदींसह अनेकांच्या स्वाक्षरी आहेत.