• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home कटाक्ष

कटाक्ष -नावात काय ?जात आणि द्वेष

by गणेश सावंत
February 27, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत –
एखादा व्यक्ती असो वा एखादी वस्तू ती नावाने ओळखली जाते. तिच्या नावावरून त्या व्यक्तीचे, त्या वस्तूचे गुण वैशिष्टय लपलेले असतात. सुर्यफुल सुर्यासारखे दिसणारे फुल, चाळणी-चाळण्यासाठी वापरणारी वस्तू, रमाकांत-रमाचा पती, शिवशारदा-शिवाजीराव आणि शारदा पती पत्नीचे नाव, अब्दुल्लाह-अल्लाहचा भक्त किंवा दास हे या नावावरून दिसून येते किंंवा लक्षात येते. कोणत्या वस्तूत अथवा व्यक्तीत त्याचा गुणधर्म दिसुन येतो. शेक्सपिअर म्हणतो, नावात काय आहे? परंतु व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या नावात बरेच काही आहे. आता आता तर नावात द्वेष दिसू लागलाय, संताप दिसू लागलाय, जाता दिसू लागलीय. हे चिंताजनकच…!


गेल्या दहा पाच वर्षाच्या कालखंडामध्ये भारतासारख्या देशात माणवी संस्कृतीनुसार नावामध्ये बरीच भिन्नता दिसून येते. खरंतर या देशाची वैवध्य पुर्ण परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती,भाषा इत्यादी बाबीचा विचार करून त्या व्यक्तीचे नाव ठेवलेले असते. म्हणूनच बर्‍याचशा नावात त्या व्यक्तीची ओळख दडलेली असते. परंतु, लोकांनी आपला स्वार्थीपणा आपआपसातील वैर आणि एकमेकांच्या वरचढपणाच्या भावनेने नावांना बदनाम करून भेदभावाला चालणा द्यायला सुरूवात केली. ज्याच्या हाती सत्ता असेल ते स्वतः उच्च आणि दुसर्‍याला निच लेखत गेले. यातून वर्णवाद आणि जातीयवाद बळावला. त्यामुळेच लोकांच्या नावात त्यांची जात शोधण्यास सुरूवात झाली. संपूर्ण भारत या वर्णवादात आणि जातीयवादात याआधी हजारो वर्षे होरपळून निघालाय आणि आताही निघत चाललाय. स्वतंत्रपुर्व काळात जेवढा होरपाळत नव्हता तेवढा तो आता होरपळतांना दिसून येतोय. याला खरंतर
सत्तापिपासू
जबाबदार म्हणावे लागतील. नावात काय आहे? हे सिध्द करण्याहेतू राजकारणी ज्या पध्दतीने नावाचा उपयोग करतात की त्याचा गैर फायदा उचलतात. हे खरं तर ज्याने त्याने ठरवायला हवं. गेल्या काही वर्षापुर्वी म्हणण्यापेक्षा सर्व प्रथम महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि शिवशाहीचे राज्य आले. तेव्हा महाराष्ट्र शासनाचे एक मासिक निघायचे त्याचे नाव ‘लोकराज्य’ होते. मात्र शिवसेना भाजपाचे सरकार आले की त्या मासिकाचे नाव बदलून शिवराज्य केले होते. पुन्हा काँग्रेस आघाडीचे सरकार आले त्या मासिकाचे नाव लोकराज्य करण्यात आले. हे राजकारण्याचं उदाहरण पाहता काल-परवाचे उत्तर प्रदेशातलेही उदाहरण ताजं तवाणं आहे. तिथं उद्योग व्यवसाय, व्यापार करणार्‍यांना आपल्या दुकानावर नावाची पाटी लावणे बंधनकारक केले होते. या मागचा सरकारचा उद्देश काय होता? तर ज्या मार्गावर हिंदू बांधवांची पारंपारिक कावड यात्रा दरवर्षी निघते, पवित्र गंगा नदीचे जल भरून हे लोक घेवून जात असतात या प्रवासात त्याना लागणार्‍या वस्तूंची फळांची त्यांना लागणार्‍या जेवणासाठी खाणावळी नेमक्या कुणाच्या आहेत? हे नावावरून स्पष्ट होईल हाच
जातीय उद्देश
उत्तर प्रदेश सरकारने मनी बाळगून उद्योग व्यवसायकीकांना नावाच्या पाट्या लावण्याचे सक्त आदेश दिले. यावरून देशभरात गदारोळ उडाला मात्र पुन्हा तोच प्रश्‍न इथे उपस्थित झाला. नावात काय आहे.? तर नावात जात आहे, धर्म आहे, द्वेष आहे, संताप आहे. शेक्सपिअरलाही वाटले नसेल आपण जे वक्तव्य केलंय ते वक्तव्य कर्तव्य कर्मापेक्षा वर्णभेदाला आणण्या साधारण महत्व देवून जाईल. नावात काय आहे. या विषयाकडे कटाक्ष टाकण्याचा एवढाच उद्देश गेल्या दोन चार वर्षाच्या कालखंडात आरक्षणाच्या मागणीवरून उभ्या महाराष्ट्रातले मराठे रस्त्यावर उतरले. त्याचा केंद्रबिंदू मराठवाडा आणि खास करून बीड जिल्हा ठरला. एकीकडे आंदोलनाची धग-धगधगत असतांना दुसरीकडे मस्साजोग सारख्या खेड्या गावात सरपंचाची हत्या झाली आणि बीड जिल्ह्यात नावात अधिक प्रमाणे जात शोधला जावू लागली. नुतन जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी गेल्या तीन महिन्याच्या कालखंडात दोन आदेश काढले.
नावाने बोला
आम्हाला वाटतं, महाराष्ट्रात नव्हे तर देशात असे काहीसे आदेश एक तर निघले नसतील नाही तर स्वतंत्र्याच्या 75 व्या वर्षापर्यंत ते अत्यंत दुर्मीळ असतील. जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी पहिला आदेश काढला तो यासह पोलीस किंवा पोलीस अधिकार्‍यांनी संबधीतांना एकमेकांना नावाने बोलायचं. म्हणजेच काय चाललंय काँवत साहेब…. असं न बोलता काय चाललंय नवनीत…. असं म्हणायचं. आता तर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी पोलीस अधिकार्‍यांना, ठाणे अंमलदारांना आप आपल्या टेबलवर केवळ आपल्या नावाची पाटी लावण्या बाबतच्या सुचना दिल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये जो काही जातीयवाद बोकाळला आहे. त्या बोकाळलेल्या जातीयवादाला काँवतांनी केलेली ही मलमपट्टी असली तरी त्यातून एक तर साध्य होईल. गणेश सावंत याचं फक्त गणेश हे नाव एखाद्यासमोर आलं तर तो कूंच्या जातीचा हे पुसटसही ओळखता येणार नाही. दुर्देवं याचं वाटतं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही आम्ही जात शोधतोय. नावात जात पाहतोय आणि एकमेकांच्या जातींचा द्वेष करतोय. शेवटी आम्हाला इथं कुसूमाग्रज आठवले ते एका कवीतेत म्हणतात………..
पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥
अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥
जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥
वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥
सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥
प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥
पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

  • कुसुमाग्रज
    50 वर्षानंतरही ही कविता ज्याने त्याने समजून उमजून घेतली आणि नावात जात शोधण्यापेक्षा त्याचे कर्तव्य कर्म शोधले तर अधिक चांगले.
Previous Post

पंतप्रधान मोदींच्या महत्वकांक्षेला बीड जिल्ह्यात हरताळ;तीन वर्षांपासून जलजीवनचे काम सुरू, गावात मात्र प्यायला पाणी नाही

Next Post

संगणक परिचालक सहा महिन्यांपासून मानधनाविना आंदोलनाचा इशारा, आर्थिक अडचणींचा सामना

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
Next Post
संगणक परिचालक सहा महिन्यांपासून मानधनाविना आंदोलनाचा इशारा, आर्थिक अडचणींचा सामना

संगणक परिचालक सहा महिन्यांपासून मानधनाविना आंदोलनाचा इशारा, आर्थिक अडचणींचा सामना

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?