बीड (रिपोर्टर) बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य आरक्षण काढण्यात येत आहे. जि.प.चे 69 गट आहेत. त्यामध्ये ओबीसीसह महिला आणि एससीचे आरक्षण काढण्यात आले. एससीसाठी नऊ गट राखीव पडले आहेत. जि.प.चे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले आहे. तर पं.स.चे आरक्षण तालुकानिहाय तहसिल कार्यालयामध्ये काढण्यात आले. यावेळी अनेक इच्छूकांची उपस्थिती होती. काहींसाठी सोयीचे गट पडले तर काहींना अडचणी निर्माण झाल्या.
ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय सुप्रिम कोर्टाने घेतल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण काढण्यात येत आहे. आज जिल्ह्यातील 69 जि.प.गट आणि पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण काढण्यात येत आहे. किट्टी आडगाव (महिला), भोगलवाडी (महिला), मोगरा (पुरूष), पिंपळनेर गणपतीचे (महिला), चौसाळा (पुरूष), उमापूर (महिला), मुर्शदपूर (मुर्शदपूर), बर्दापूर (पुरूष), होळ (पुरूष) हे नऊ गट एससीसाठी राखीव पडले आहेत. तर परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील गट अनुसूचित जमातीसाठी सुटला आहे. अठरा गट ओबीसीसाठी सुटले असून यात नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत. यामध्ये रेवकी (महिला), तलवाडा (महिला), मादळमोही, पाडळसिंगी (महिला), पात्रुड, दिंद्रुड, रायमोहा, बीडसांगवी (महिला), आष्टी हरिनारायण, तेलगाव, पिंप्री बु. (महिला), सिरसाळा, धर्मापुरी, पट्टी वडगाव, मातोरी (महिला), नाळवंडी (महिला), जोगाईवाडी (महिला), डोंगकिन्ही (महिला) या गटाचा समावेश आहे. 21 जि.प.गट सर्वसाधारण महिलेसाठी सुटले असून यामध्ये ताडसोन्ना, पाडळी, सौताडा, दौलावडगाव, धानोरा, आडस, आसरडोह, चनई, गढी, सादोळा, चिंचोली माळी, टोकवाडी, धोंडराई, टाकरवण, पाली, दाऊतपूर, घाटनांदूर, विडा, राजुरी न., बहिरवाडी, नागापूर यांचा समावेश असून इतर वीस गट सर्वसाधारण पुरूषासाठी सुटले आहेत. यामध्ये जातेगाव, धोंडराई, चकलांबा, रूई, टाकरवण, कवडगाव, उपळी, चिखलबीड, लिंबागणेश, नेकनूर, शिरूर तालुक्यातील पिंपळनेर, तांबाराजुरी, अंमळनेर, धामणगाव, लोणी, कडा, नांदूरघाट, युसूफवडगाव, बनसारोळा, मोरेवाडी, पाटोदा ममदापूर या गटाचा समावेश आहे. हि आरक्षणाची सोडत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली. हि सर्व प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.दयानंद जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा परिषद पंचायत निवडणूक विभागाच्या नागरगोजे यांनी हि प्रक्रिया पार पाडली.