बीड, (रिपोर्टर)ः-पत्नीस प्रसृतीसाठी हॉस्पिटलमध्ये घेवून गेल्यानंतर पाठीमागे एका शिक्षकाच्या घरामध्ये चोरी केली. घरातील सोन्याच्या दागिन्यासह नगदी रक्कम असा एकूण 69 हजार 330 रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गेवराई तालुक्यातील ताकडगाव येथे घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विनोद नामदेव पौळ हे आपल्या पत्नीस प्रसृतीसाठी हॉस्पिटलमध्ये घेवून गेले असता अज्ञात चोरट्याने याच संधीचा फायदा उचलून त्यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यासह नगदी रक्कम असा एकूण 69 हजार 330 रूपयांचा ऐवज चोरून नेला. घरी परत आल्यानंतर पौळ यांना आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








