
परळी वैजनाथ (रिपोर्टर): माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथे तहसीलच्या पाठीमागे त्यांच्या निवासस्थानाजवळ शासकीय शिष्टाचारात आज सकाळी 11 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं परवा अपघाती निधन झालं.लातूर-सोलापूर महामार्गावर पाणी साचले आणि पाणी उडून काचेवर आले. यामुळे चालकास समोरचे काही दिसले नाही. अचानक ब्रेक लावला. यामुळे गाडी घसरत जाऊन पलटी झाली. गाडीने चार पलट्या खाल्ल्या. रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. यामध्ये माजी आमदार आर. टी. देशमुख यांचं काल अपघाती निधन झालं.
आज सकाळी परळी येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ शासकीय इतमामात त्यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ना. पंकजाताई मुंडे, खा. बजरंग सोनवणे, खा. ओमराजे निंबाळकर, आ. नमिता मुंदडा, आ. रत्नाकर गुट्टे, माजी आ. प्रा. संगीताताई ठोंबरे, आ. विटेकर, आ. गुट्टे, फुलचंद कराड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.









