
माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव तालुक्यातील महातपुरी शिवारातून गोदावरी नदी पात्रातून वाळू घेऊन जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी सदरील ठिकाणी जावून तीन ट्रॅक्टर, ट्रॉली ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश राजाभाऊ शिंदे (रा. महातपुरी), रमेश बाबासाहेब चव्हाण, चत्रभूज तुकाराम कोलथे या तिघा जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघे महातपुरी शिवारातील गोदावरी पात्रातून तीन ट्रॅक्टर व ट्रॉलीमधून वाळू घेऊन जात होते. याची माहिती ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून ट्रॅक्टर ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.










