ब्रेकिंग न्यूज
८० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
पाणी पुरवठा मधील कार्यकारी अभियंता,लिपीक पकडले.
बीड रिपोर्टर – घनकचरा व सांडपाणी योजनेअंतर्गत नाली बांधकामाचे बिल काढण्यासाठी 80 हजार रुपयाची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे आणि वरिष्ठ लिपिक किरण कुमार हिवाळे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले ही कारवाई आज सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली या कारवाईमुळे लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे
बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे आणि वरिष्ठ लिपिक किरण कुमार हिवाळे या दोघांना 80 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली या कारवाईमुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागात जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुरू असलेले लाचखोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे.
सध्या बीड जिल्ह्यात जल जीवन मिशनची जवळपास हजारो कामे सुरू आहेत या कामाच्या टेंडर प्रक्रियेपासून ते फायनल बिल काढण्यापर्यंत विद्यमान कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे असो की यापूर्वीचे गेल्या तीन वर्षातील कार्यकारी अभियंता उपअभियंता शाखा अभियंता एवढेच काय पण टेंडर क्लर्क पासून ते शिपायापर्यंत अनेक जण पैसे घेतल्याशिवाय सहीच करत नव्हते अशी या विभागाची चर्चा होती. कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे लिपिक किरण कुमार हिवाळे या दोघांनी 80 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले.मुकुंद आंधळे यांनी बीड जिल्ह्यातील अनेक गुत्तेदारांचे बिल काढण्यासाठी कार्यालयातील कर्मचारी व खाजगी इसमा द्वारे टक्केवारी गोळा करत होते अशी चर्चा मागील काही महिन्यापासून होती. ही कारवाई ग्रामीण पाणी पुरवठा च्या कार्यालयात झाली आहे.
सदरची कारवाई ही .श्री. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, श्री. मुकुंद आघाव,अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, पोलीस उप अधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, सपोउपनि सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुडे, अनिल शेळके अविनाश गवळी, अमोल खरसाडे संतोष राठोड प्रदिप सुरवसे, अंबादास पुरी सर्व ला.प्र.वि.बीड युनिट यांनी कारवाई केली आहे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांनी आंधळे यांच्या घराची व मालमत्तेची चौकशी केल्यास कोट्यावधी रुपयांची संपत्ती असण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील मागील काही दिवसांमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही मोठी कारवाई आहे.











