प्रेम प्रकरणातून झाली होती मारहाण
गेवराई (रिपोर्टर): प्रेम प्रकरणाच्या कारणावरून गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील एका तरुणास पाचजणांनी बेदमपणे मारहाण करून गंभीररित्या जखमी केले होते. या जखमी तरुणास रात्री छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाचजणाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवम काशीनाथ चिकणे (वय 21) या तरुणास काल पाचजणांनी प्रेमप्रकरणाच्या कारणावरून बेदमपणे मारहाण करत जखमी केले होते.
त्यास उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. शुभमचे वडील काशीनाथ चिकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवम गणेश यादव, सत्यम मांगले, गणेश सुखदेव यादव, राजाभाऊ यादव, ईश्वर यादव यांच्याविरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









