गेवराई (रिपोर्टर) स्वातंत्र्यप्राप्ती आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या उभारणीत काँग्रेसने मोलाचे योगदान दिले असून काँग्रेसला त्यागाचा, बलिदानाचा इतिहास आहे. मात्र आजची परिस्थिती पाहता 2014 पूर्वीचा देश आणि आज देशातील जनतेचे होणारे हाल ही देशाच्या अधोगतीचे लक्षण आहे. भाजपने या देशाचे वाटोळं केलं असून येणार्या काळात भाजप आणि मोदी हे देश विकल्या शिवाय राहणार नाहीत. आज देशात फक्त हुकुमशाही चालत असून मोदी आणि अमित शहा ही लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केला.
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसच्या वतीने देशासह राज्यात आझादी का गौरव तिरंगा पदयात्रा सुरू असून ही यात्रा सकाळी 11 वा.गेवराई शहरात पोहचली यानंतर बायपास येथून मोंढा नाका, आंबेडकर चौक, शास्त्री चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी मिरवणूक झाल्यानंतर नवीन बस्थानकासमोर महेश बेदरे यांच्या कार्यालयासमोर समारोप कार्यक्रम संपन्न झाला. या रथ यात्रेत जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख, आदित्य पाटील, मिनाक्षीताई पाडुळे, नवनाथ थोटे, पशुपती दांगट, बाळासाहेब ठोंबरे, गणेश बजगुडे, युवक जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, परवेज कुरेशी, रंजित देशमुख,प्रा.अनिल जाधव, किशोर शिंदे, संतोष निकाळजे, वसंतराव शिंदे, कल्याणराव देशमुख, देवकर मामा, संभाजी जाधव यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, भारताची एकता, अखंडता कायम राखण्यात आणि भारताची नेत्रदीपक प्रगती साधण्यात काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेत, राष्ट्रीय एकात्मतेचा पाया घालत काँग्रेसने देशात लोकशाही रुजवली. आज देशातील ही लोकशाही, एकता संकटात आहे. वाढती महागाई, बेरोजगारी अशा प्रश्नांमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. शेतकरी त्रासला आहे. तरुणांचे स्वप्न भंगले असून मोदी आणि शहा हे देश लुटण्याचे काम करत असून ईडी सारख्या कारवाया करून विरोधकांना संपवण्याचे काम करत असून मोदी शहा ही लुटारूंची टोळी असल्याचा घणाघात त्यांनी केला. तर केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने आपला आवाज उठवन्यासाठी रस्त्यावर उतरत आसून सर्वसामान्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे याच अनुषंगाने आज देशभरा मध्ये काँग्रेस देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त आझादी का गौरव तिरंगा पदयात्रा चालू असून येणार्या काळात देश वाचवायचा असेल तर काँग्रेस पक्षाला ताकद देण्याची गरज असल्याचे सांगत या यात्रेच्या उत्कृष्ट नियोजनाबाबत तालुकाध्यक्ष महेश बेदरे यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी आदित्य पाटील, नवनाथ थोटे, प्रा.विजय जाधव, यांनी मनोगत व्यक्त करत केंद्र सरकारच्या हुकुमशाहिचा समाचार घेतला. या यात्रेचे व कार्यक्रमाचे चोख नियोजन तालुकाध्यक्ष महेश बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष बाळासाहेब आतकरे, तालुका उपाध्यक्ष मनोहर चाळक, मधुकर वारे, सय्यद सिराज, सोपान टेकाळे, अंकुश पाचपुते, राजाराम पवार, यांनी केले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बेदरे यांनी सूत्रसंचालन सुशील टकले यांनी तर आभार श्रीनिवास बेदरे यांनी मानले.