
बीड / परळी (रिपोर्टर)ः- परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील एका घरात गुटखा असल्याची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून 2 लाख 90 हजार 500 रूपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्मापुरी येथील बाबुराव श्रीपतराव मुसळे यांच्या घरात गुटखा असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून 2 लाख 90 हजार 500 रूपयांचा गुटखा पकडला. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.









