
पुण्यतिथीनिमित्त अनेकांकडून काकूंना अभिवादन
बीड, (रिपोर्टर)ः- माजी खा.स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्या 19 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज सकाळपासून काकूंच्या समाधीस्थळी अनेकांनी अभिवादन केले. या निमित्ताने आयोजित किर्तनाच्या कार्यक्रमाला जिल्हाभरातून अनेकांची उपस्थिती प्रखर्शाने दिसून आले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी काकूंच्या जिवन कार्याला उजाळा देत काकू अहिल्यानगर -बीड – परळी रेल्वे मार्गाच्या शिल्पकार असल्याचे म्हंटले.
बीड जिल्याच्या माजी खा.स्व.केशरकाकू क्षीरसागर यांची आज 19 वी पुण्यतिथी त्यानिमित्ताने आज त्यांच्या समाधी स्थळी अनेकांनी अभिवादन केले. त्या निमित्ताने केएसके कॉलेज परिसरात रामायणाचार्य ह.भ.प ढोक महाराज यंाचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काकूंच्या कार्याला उजाळा देतांना म्हंटले. इ.स.1995-96 साली काकू खासदार असतांना रेल्वे बजेट दरम्यान खर्या अर्थाने अहिल्यानगर- बीड- परळी रेल्वेसाठी निधी पडला. काकूंनी अत्यंत प्रतिकृतपरिस्थितीत आम्हा सर्वांना तर वाढवलेच परंतू जगाचा रहाट गाडा ही चालवला. त्यांचे संस्कार, त्यंाचे कार्य पुढे नेण्याचे काम आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. सत्ता असो या नसो लोकांची कामे करणे, लोकसेवा करणे ही काकूंची शिकवण आहे. तो वारसा आम्ही पुढे नेत असल्याचे अण्णांनी म्हंटले. वेळे अभावी त्यांचे भाषण पुर्ण देता आले नाही. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह क्षीरसागर कुटूंब त्याच बरोबर क्षीरसागर कुटूंबियांवर प्रेम करणारे उपस्थित होते.






