
गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे जुन्या तारा आहेत. या तारा वारंवार तुटून पडत आहेत. तरीही वीज वितरण कंपनी नवीन तारा बसवत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. विजेच्या तारा तुटून जीवीत हानी झाल्यास याला सर्वस्वी विज वितरण कंपनीचे अधिकारीच जबाबदार राहतील.
चकलांबा येथील बाजार पेठेमध्ये विजेची तार तुटून पडली होती. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र सातत्याने या विजेच्या तारा तुटत आहेत. तारा दुरुस्त करण्याबाबतची मागणी वेळोवेळी करण्यात आली मात्र याकडे संबंधित विभागाचे इधकारी दूर्लक्ष करत आहेत. या तारांमुळे जिवीत हानी होऊ शकते. जिवीत हानी झाल्यास याला सर्वस्वी विज वितरण कंपनीचे अधिकारीच जबाबदार राहतील, असा इशारा गावकर्यांनी दिला आहे.










