
मजूर मिळत नसल्याने इतर ठिकाणावरून मजूर आणण्याची वेळ
बीड (रिपोर्टर): सात ते आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कापूस फुटायला सुरुवात झाली. कापूस वेचायला मात्र मजूर मिळत नसल्याने काही शेतकर्यांना इतर ठिकाणाहून मजूर आणण्याची वेळ येऊ लागली. वेचणीला दहा ते बारा रुपयांचा दर आहे.
अतिरिक्त पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीतून जो काही कापूस शिल्लक राहीला आहे तो फूटू लागला आहे. पावसाने उघडीप दिल्याने कापसाची पहिली वेचणी सुरु झाली. अनेक गावात कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकर्यांना इतर ठिकाणावरून मजूर आणण्याची वेळ आली आहे. वेचणीला दहा ते बारा रुपयांचा दर आहे.







