कामगार कार्यालयावर कामगारांचा मोर्चा
बीड, (रिपोर्टर)ः- बांधकाम कामगारांना 15 हजार रूपये दिवाळी बोनस देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने कामगार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
जिल्ह्यात नवीन भांडेसेट देण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी, कामगारांना 15 हजार दिवाळी बोनस देण्यात यावे, सहा महिन्यापासून प्रलंबित नोंदणी व नुतनीकरणाचे अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावे, अटल घरकुल बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर करावे, चुकीच्या त्रुटी नोंदणी व नुतनीकरण व लाभार्थ्याच्या अर्जात काढणार्या नोंदणी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने कामगार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.








