राष्ट्रवादीच्या प्रचार फेर्या सुरू
आमदार सोळंके विरोधकांना पडतायेत भारी
माजलगाव नगरपालिकेचे राजकारण थंडी तापू लागले
माजलगाव, दिनकर शिंदे : माजलगाव नगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून तुतारी च्या मोहन जगताप आणि नेतृत्वहीन असलेल्या भाजपाला मात्र नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या उमेदवार्या जाहीर करण्यास मुहूर्त मिळत नसून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करत प्रचाराला सुरुवात देखील केली. त्यामुळे आमदार सोळंके विरोधकांना भारी पडत असून ऐन थंडीमध्ये माजलगाव नगरपालिकेचे राजकारण तापत आहे.
येत्या दोन डिसेंबरला नगरपालिकेचे मतदान होणार आहे.
त्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना अद्यापही माजलगावात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख मोहन जगताप आणि माजलगावात नेतृत्वहीन असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींना माजलगावात उमेदवारी कोणाला द्यावी हे अद्यापही जमत नाही का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर दुसरीकडे मात्र विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी पत्रकार परिषद घेत नगराध्यक्षपदासह 13 प्रभागातील 26 नगरसेवक पदाच्या उमेदवार्या जाहीर केल्या असून त्यांच्या प्रभाग फेर्यांसह बैठका देखील सुरू झाल्या आहेत या उलट उद्या दिनांक 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. अवघे काही तास शिल्लक असताना देखील भाजपा व तुतारीच्या वतीने उमेदवारी जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळे मतदार वर्ग संभ्रमात आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत देखील तुतारीचे मोहन जगताप यांनी उमेदवारीसाठी वेळ काढून अवलंबत चूक केली होती त्यामुळे त्यांना मतदारापर्यंत पोहोचण्यास देखील कमी वेळ मिळाला होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सध्याचा नगरपालिका निवडणुकीत देखील अशीच काहीशी परिस्थिती होताना दिसत आहे.
जयसिंग सोळंके झुकेगा नही साला च्या भूमिकेत
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयसिंग सोळंके यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारात कंबर कसली असून वडवणी नगरपंचायत च्या धरतीवर माजलगाव नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणण्यासाठी जयसिंग सोळंके हे मै झूकेगा नही साला च्या भूमिकेत आहेत.











