शिवसेनेकडून येवले, अजितदादा गटाकडून खलील पटेल, भाजपाकडून मेंडके तर शरद पवार गटाकडून चाऊस
माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव नगरपालिका निवडणूक अटीतटीची होणार असून याठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आज जाहीर केले. शिवसेनेच्या वतीने राधा येवले, अजितदादा गटाकडून मेहरुन्नीसा पटेल, भाजपाकडून संध्या मेंडके तर शरद पवार गटाकडून मेहरीन चाऊस यांना उमेदवारी घोषीत करण्यात आल्यानंतर आज या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. प्रमुख पक्षांनी आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राधा तुकाराम येवले, अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडून मेहरुन्नीसा खलील पटेल, भाजपाकडून संध्या ज्ञानेश्वर मेंडके तर शरद पवार गटाकडून मेहरीन शिफा बिलाल चाऊस यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली. या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले. माजलगाव शहरामध्ये चौरंगी लढत होणार आहे.










